
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (कंधार):-कौठा येथील मन्याड नदीवरील पुल व बंधाऱ्यास आ शामसुंदर शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली असून कामासाठी ३कोटी १५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरिल कामासाठी आमदार शामसुंदर शिंदे सर्मथक प्रफुल्ल येरावार, ओम देशमुख, बसवेश्वर मडके यांनी मागील तीन वर्षांपासून पाठपुरावा केल्याने प्रश्न मार्गी लागल्याने गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.
कंधार तालुक्यातील कौठा येथील मन्याड नदीवरील पूल व बंधारा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून रखडला होता.कौठा, जाकापुर,रहाटी ,वरवंट सिरसी,मंगनाळी,कळका,आदि गावकऱ्यांना पावसाळ्यात नदी पार करून जाणे जिवावर बेतत होते हिचं बाब ओळखून या कामासाठी पाठपुरावा केला होता.आ. श्यामसुंदर शिंदे यांनी मतदाराला दिलेले आश्वासन आणि कार्यकर्त्याचा पाठपुराव्यामुळे सदरील कामास गती मिळाली आहे. पुल व बंधाऱ्याच्या कामासाठी प्रफुल्ल येरावार, ओम देशमुख, बसवेश्वर मडके यांनी सतत पाठपुरावा करून काम मार्गी लावले आहे जलसंधारण विभागाच्या वतीने निविदा निघताच गुत्तेदारासह जागेची पाहणी करून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे जलसंधारण विभागाचे अभियंता गायकवाड यांनी सांगितले पुल व बंधारा झाल्यास १० गावचा दळणवळणाचा व सिंचनाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे तर कौठा येथील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय निकाली निघणार आहे सदरिल काम मार्गी लागल्याने आ श्यामसुंदर शिंदे तसेच सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांचें आभार मानले आहेत.