
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
बाजीराव गायकवाड
नांदेड (लोहा):- कलंबर खुर्द ता. लोहा येथे नांदेड बिदर हायवे रस्त्यावरती मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अंतरवाली सराटी ता.अंबड जि. जालना येथील मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्याकरिता कलंबर खुर्द व परिसरातील नागरिकांनी कलंबर येथे नांदेड ते बिदर हायवे वर रस्ता रोको आंदोलन केले त्यावेळी रस्त्यावरती वाहनाच्या बराच वेळ रांगा लागल्या होत्या. दोन तास रस्ता रोको आंदोलन करून शेवटी गावकऱ्यांनी शपथ घेतली व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला जर एका महिन्यामध्ये सरकारने आरक्षणाचा कोणता निर्णय नाही घेतला तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा गावकऱ्यांनी इशारा दिला त्यावेळी गावातील व परिसरातील अनेक मराठा समाज बांधव उपस्थित होते.