
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे…
जालना (मंठा):- (दि१६)रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, पांगरी खुर्द शिवारामध्ये अवैधरित्या जेसीबीच्या साह्याने मुरुम उत्खनन चालु आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने संयुक्त कारवाईसाठी पोलीस व महसुलचे संयुक्त पथक यांनी सदर ठिकाणी ६.३० ते ०७ वाजेच्या सुमारास पांगरी खुर्द येथे जावुन पाहीले असता तेथे एक विनाक्रमांकाचे जेसीबी व दोन छोटे विनाक्रमांकाचे चारचाकी टिप्पर असे
अवैद्यरित्या मुरुम उत्खनन करताना व टिप्परमध्ये भरताना मिळुन आले त्यावरुन सदर जेसीबी व टिप्पर ताब्यात घेत असतांना तेथील दोन टिप्पर चालकांनी पोलीसांना पाहुन टिप्परसह तेथुन पळ काढला परंतु संयुक्त पोलीस व महसुल पथक हे जेसीबी घेवुन पोलीस ठाणेस येत असतांना ईसम नामे 1) बाळासाहेब उर्फ अदित्य सदावर्ते रा. माळतोंडी ता.मंठा 2) जेसीबीचा ड्रायव्हर सदानंद राठोड रा. हिवरखेडा
ता. मंठा 3) विशाल संजय जाधव रा. सासखेडा ता.मंठा व इतर चार ते पाच अज्ञात इसमांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन सरकारी कामात अडथळा निर्मान केला म्हणुन सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि आस्मान शिंदे व पोलीस अंमलदार संतोष बनकर हे करीत आहेत. सदर कारवाई मध्ये एक जे.सी.बी. ताब्यात घेण्यात आला असुन गुन्ह्यातील आरोपी व पळुन नेलेले दोन टिप्पर याबाबत अधिक तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक जालना, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग परतुर,यांच्या मार्गदर्शनाखाली, मा.श्रीमती रूपा चित्रक तहसीलदार मंठा, मा. पोलीस निरीक्षक एम.बी.खेडकर पोलीस ठाणे मंठा, व पोस्टेचे, पोलीस उप निरीक्षक आस्मान शिंदे, पोलीस अंमलदार, शिवानंद काळुसे, राजु राठोड, श्याम चव्हाण, श्याम गायके, जगन सुक्रे, उपरे, मनोज काळे, संतोष बनकर, आसाराम मदने, पांडुरंग निंबाळकर, व महसुल पथकाचे कर्मचारी विजय आढ़े व चालक रामेश्वर राऊत यांनी केली आहे.