
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ : नोंदणीची मुदत ३०सप्टेंबर २०२३…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे…
जालना (मंठा):-तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोबाइल अॅपवर आपल्या शेतातील पिकांची ई पीक नोंदणी केली. मात्र ती तलाठ्यांच्या रेकार्डला येत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महसूल विभागाने या बाबीकडे अजूनही लक्ष दिले नाही.
शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल तर अगोदर ई पीक नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. नुकसानभरपाई असो की, शेतातील उत्पादनाची विक्री असो यासाठीही ई पीक नोंदणी बंधनकारक झाली. ई पीक नोंदणीसाठी शासनाच्या महसूल विभागाकडून एक ॲप विकसित करण्यात आले.
या अॅपवर
तीन वर्षापासून शेतकरी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करीत आहे. या वर्षी अॅपवर ई पीक नोंदणीची मुदत १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी एक महिन्यापूर्वीच ई पीक नोंदणी केली. परंतु, ही नोंद तलाठी कार्यालयातील सातबारा दस्तऐवज दिसत नसल्याने यंत्रणा
हवालदिल झाली. असा प्रकार संपूर्ण तालुक्यातच घडत असल्याची शेतकऱ्यांतुन बोललं जात आहे. आता तालुक्यातील स्वायाबीन पीक अंतिम टप्प्यात येत असुन पाऊस नसल्याने पिक शेतकऱ्यांच्या हातात येत की जाते यात चिंतेत अडकला आहे.
मात्र पिक पदरात पडले तर
शेतकऱ्यांना ई पीक नोंदणी झालेला तलाठी कार्यालयातील सातबारा आणि नमुना आठ ही कागदपत्रे संबंधित खरेदी केंद्रावर सबमिट करणे आवश्यक असते परंतु नोंदणी व झाल्यास त्यांना कार्यालयातून परत यावे लागणार आहे.
आकार्यक्षम तंत्रदान…
शेतकऱ्यांनी केलेली ईपीक नोंदणी तलाठी कार्यालयातील सातबारा उताऱ्यावर न येण्याचे येण्याचे कारण कमकुवत सॉफ्टवेअर असल्याचे बोलले जात आहे. तलाठ्यांनी ही बाब अनेकदा आपल्या वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. मात्र वरिष्ठांनी याकडे लक्ष न देता शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचेच निर्देश दिल्याचे समजते.
या कारणाने ई पीक नोंदणी…
यापूर्वी पीक नोंदणी तलाठ्यांमार्फत व्हायची. तेव्हा ही पीक नोंदणी वस्तुनिष्ठ होत नसल्याचा आरोप झाला. तलाठी कार्यालयात बसूनच पीक नोंदणी करतात, असेही बोलले जायचे. शासनाने पीक नोंदणीत बदल करून २०२१ पासून शेतकऱ्यांनी स्वतःच पीक नोंदणी स्वतःच करावी, असे आदेश काढले. २०२१ च्या माहितीनुसार मंठा तालुक्यात ६२७७६ शेतकरी खातेदार आहेत.त्यापैकी ११८०२
शेतकयांनी केली अँपमध्ये नोंद झाली आहे. ५०९६५ शेतकऱ्यांची नोंद बाकी