
दै.चालू वार्ता
दिनकर गडदे प्रतिनिधी वाशिम
वाशिम: जयपूर येथे सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता, विघ्नहर्ता, बाप्पाच्या स्वागतासाठी पंधरा दिवसापूर्वी संपूर्ण जयपूर नगरीत लगबग सुरू होती. घराघरात चैतन्य घेऊन आलेल्या या बाप्पाची आराधना करताना दहा दिवस कधी संपले कळलच नाही. जयपुर येथे साजऱ्या झालेल्या आनंद उत्सवाची आज गुरुवारी सांगता करण्यात आली.’ गणपती गेले गावाला. चैन पडेना आम्हाला ‘अशा घोषणा देत जयपुर येथील मानाचा गणपती जय मल्हार मित्र मंडळ आणि नागरीक आज गुरुवारी बाप्पाला ठीक 2:50 मिनिटांनी मिरवणुकीस सुरुवात झाली. व संध्याकाळी ठीक 8:35 मिनिटांनी गणपती बाप्पाचं वाजत गाजत ढोल ताशाच्या आवाजात विसर्जन करण्यात आले.
तसेच बाप्पाला निरोप देण्यासाठी खास करून पावसाच्या सरीही आणि ढगाळ वातावरण दिसून आले आहे बाप्पाला निरोप देण्यासाठी. कार्यकर्ते.विलासराव मस्के, संबाराव पोले, दिनकर मस्के, दगडू मस्के, विठ्ठल गादेकर सर, गिरजाराम मस्के, विनोद मस्के, गजानन रा मस्के, समाधान मस्के, अशोक मस्के, सुभाष मस्के, गजानन ज मस्के, शामराव मस्के, कुबिर मस्के, विश्वनाथ मस्के, शिवाजी मस्के, शंकर मस्के, भाऊराव मस्के, कैलास मस्के, लक्ष्मण भोईनवाड, शेषराव मस्के, पांडुरंग मस्के, दिलीप गडदे, गणेश मस्के, धुळबाराव मस्के, नारायण मस्के, बंडू मस्के, बाजीराव मस्के, यशवंत मस्के, भगवान मस्के, बाबू मस्के व रामा मस्के खास करून लहान लहान मुले व मुली उपस्थित होते