
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (लोहा) :- नांदेड जिल्हातील लोहा तालुक्यातील पिंपळदरी ते धनंज खुर्द येथे जाण्यासाठी रस्ता राहिला नसून चिखलातून गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पायी चालताना पाय घसरून नागरिक पडत आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली आहे. पिंपळदरी व धनंज खुर्द येथील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी व जिल्हाच्या ठिकाणी तसेच दवाखानात आणि शाळेत जाण्यासाठी रस्ता पुर्ण खड्डेमय झाला असून लोकप्रतिनिधी फक्त मतदान असेल तेव्हा प्रकट होतात.पुन्हा त्यांचे दर्शन होत नाही. रस्त्याचे काम काही करत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करून पिंपळदरी व धनंज खुर्द येथील नागरिकांना होणारा त्रास कमी करावा.लोकप्रतिनिधी यांनी सुध्दा या रस्त्याचे काम कोणत्याही योजनेतून मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी पिंपळदरी व धनंज खुर्द ता. लोहा जि नांदेड येथील नागरिकांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते गोविंद जाधव पिंपळदरीकर यांनी दै चालु वार्ता शी कळविले आहे.