
लिंगायत समाजाची मागणी…
दैनिक चालू वार्ता
नांदेड दक्षिण तालुका प्रतिनिधी गोविंद मोरे
नांदेड दि. 18 – माथेफिरू आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लोकशाहीचे जनक, थोर समाजसुधारक लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्याबद्दल त्यांनी आत्महत्या केली, असे अवमानजनक वक्तव्य नुकतेच समाजमाध्यमांसमोर केले आहे. त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यामुळे देशभरातील 8 कोटी लिंगायत व बसवप्रेमी समाजबांधवांच्या भावना दुखावल्या. यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेकवेळा महापुरूषांचा अवमान केलेला आहे. त्यामुळे त्याच्या आमदारकीचा तात्काळ राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी मंगळवारी लिंगायम समाजबांधवांच्या वतीने नांदेड येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्याजवळ आंदोलन करून आ. आव्हाड यांचा जाहीर निषेध केला.
यावेळी अॅड. अविनाश भोसीकर, पप्पू सोनटक्के, बालाजी एकलारे, उमेश माळगे, श्रीकांत चाकोते, अक्षय इरलोड, कार्तिक इभते, नागेश यांच्यासह लिंगायम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————-