
खासदार सुप्रिया सुळे रहाणार उपस्थित…
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष संसदरत्न खा. सुप्रिया सुळे या गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी इंदापूर विधानसभा मतदार संघाच्या दौर्यावर येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदापूर तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा छायाताई पडसळकर यांनी दिली आहे.
त्या म्हणाल्या, खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती ही केल्या जाणार आहेत.या मेळाव्याचे आयोजन शहा सांस्कृतिक भवन इंदापूर या ठिकाणी करण्यात आले आहे, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदर मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या इंदापूर तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर यांनी केले .