
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- नांदेड जिल्हातील कंधार तालुक्यातील मौजे येलूर येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील शिंदे येलूरकर यांची भारतीय जनता पक्षाच्या पंचायतराज व ग्रामविकास विभाग नांदेड च्या सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड येथे भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग प्रदेश संयोजक गणेश काका जगताप यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर पाटील शिंदे येलूरकर यांची सहसंयोजक पदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे.केलेल्या निवडीबद्दल खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ज्ञानेश्वर पाटील शिंदे यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच सर्व नांदेड जिल्हातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.