
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे…
पुणे (इंदापूर): राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या विभागामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा असणारा विभाग म्हणजे ओबीसी सेल या ओबीसी सेलच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी बोरी येथील युवा उद्योजक ज्ञानदेव शिंदे यांची तर इंदापूर तालुका कार्याध्यक्ष पदी गोतोंडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तात्याराम बनसोडे यांची निवड आज संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना ज्ञानदेव शिंदे व तात्याराम बनसोडे म्हणाले की आम्हाला समाजकार्याची आवड आहे.आम्हाला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून पक्षहिता बरोबरच पक्षवाढीसाठी प्रयत्नशील राहू तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेस ओबीसी सेलच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, ज्ञानदेव शिंदे यांनी यापूर्वी अनेक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवल्याने त्याची दखल घेत राष्ट्रवादी काॅंग्रेस ओबीसी सेलच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
गोतोंडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तात्याराम बनसोडे यांनीही आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे.यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड इंदापूर तालुका ओबीसी सेलच्या कार्याध्यक्ष पदी केली आहे.
सुप्रिया सुळे यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपण पक्षाच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे काम करणार असून जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी माजी सभापती प्रवीण माने, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, जिल्हा अध्यक्षा भारती शेवाळे,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल चंद्रकांत राऊत, तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील,इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा छायाताई पडसळकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष सागर बाबा मिसाळ,तालुका कार्याध्यक्ष महारूद्र पाटील, इंदापूर शहर अध्यक्षा रेश्मा शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.