
कुत्रा चावल्यास पीडित व्यक्तीला सरकारने१० ते २० हजार रुपये भरपाई देण्याचे हायकोर्टाचेआदेश .
दैनीक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा शहर आणि तालुक्यांत दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची समस्या बिकट होत चालली आहे . मे २०२३ ते १५ नोव्हेंबर २०२३ ची बोलकी आकडेवारी पहाता म्हसळा ग्रामिण रुग्णालयांत कुत्रा दंशाचे १४० रुग्ण, याच कालावधीत मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्र १०, खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्र १२ आंबेत प्राथमिकआरोग्य केंद्र ४, जिल्हा परिषद दवाखाना पाभरे ३ आशा १६९ जणाना भटके कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या , त्यामुळे म्हसळा शहर आणि तालुक्यांत भटक्या कुत्र्यांची समस्या बिकट बनली आहे असेच चित्र आहे .भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याच्या अनेक घटना समोर येतात. पण यानंतरही नगरपंचायत अगर स्थानिक स्वराज्य संस्था कडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाही असेच दिसते, मोठ्या नगरपालीका किंवा महापालीकांतून श्वानांची नसबंदी हा तर केवळ फार्सच ठरत आहे. म्हसळा नगरपंचायतींत तात्रिक मनुष्य बळाचा आणि तालुका पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाचा निरुत्साह यामुळे श्वानांची नसबंदी करणे म्हसाळ्यांत अशक्य होत आहे .यादरम्यान हायकोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कुत्रा चावल्यास पीडित व्यक्तीला सरकारने १० ते २० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश एका प्रकरणाच्या सुनावणीत हरियाणा आणि पंजाब हायकोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे.