
दैनीक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – खारगावं खुर्द ग्रामविकास जनसेवा मंडळ यांच्या वतीने आज दि.२३/११/ रोजी कार्तिकी एकादशी निमित्त गावाचा एसटी पिकअप शेड ची स्वच्छता करण्यात आली या मंडळाच्या स्वच्छता अभियान निरंतर सुरू असल्याचे पहायला मिळतो आहे या पूर्वी ही या मंडळाने गावातील अनेक रस्ते स्मशानभूमीत, शेतीकडे जाणारे रस्ते यांची स्वच्छता केली होती यापुढेही गावाची स्वच्छता करणार असल्याचे सांगितले आजच्या या स्वच्छता अभियान यशस्वी राबविण्यात श्री महादेव पाटील, श्री चंद्रकांत कांबळे, श्री मंगेश म्हात्रे, श्री मनोहर पाटील, आणि आदिवासी बांधव यांनी सहकार्य केले, अश्या पद्धतीने स्वच्छता अभियान उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामस्थ मंडळीने एकत्र येऊन आपल्याही पंचक्रोशीत स्वच्छता मोहीम राबवून गाव स्वछ व सुंदर कशापद्धतीने करता येईल. ते करण्यासाठी प्रयत्न करावा खारगाव खुर्द ग्रामविकास जनसेवा मंडळ यांच्या वतीने केलेला प्रयोग हा अभिमानास्पद असून प्रत्येक वाड्या वस्त्यावरील नागरीकांनी यांचा बोध घेण्यास काही हरकत नाही. समाजातून आणि गावा, गावातून या मंडळाचे नागरिकांचे कौतुक होत आहे.