
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे:इंदापूर तालुक्यातील काझड येथील निरा भिमा नदी जोड प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये काल दुर्दैवी २ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला यामध्ये कै. अनिल बापूराव नरूटे पाटील व कै. रतिलाल बलभीम नरूटे पाटील या दोन शेतकऱ्यांचा समावेश होता.त्याच बरोबर कै. सुनील शिवाजी नरूटे पाटील यांना कावीळ झाली होती,यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.यामुळे काझड पंचक्रोशीत व नरूटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
आज या कुटुंबीयांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा छायाताई पडसळकर यांनी काझड येथे जाऊन नरूटे कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली. आणि दुःखातून सावरण्यासाठी नरूटे कुटुंबीयांना आधार देण्याचा प्रयत्न केला.छायाताई पडसळकर यांनी शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या इंदापूर शहर अध्यक्षा रेश्मा शेख, अनिल ढावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.