
दै.चालु वार्ता
प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर)- श्री संत शंकरस्वामी महाराज समाधी मंदिर संस्थानच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी शिवूर ते आळंदी दि.२४ शुक्रवार रोजी पायीदिंडीचे प्रस्थान झालेत त्यावेळी संस्थान चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, विश्वस्थ मंडळ, वारकरी, भाविक व गावकरी यांनी रथ पालखी ची पूजा करून पायीदिंडी ला सुरवात केली
पायी दिंडीचा मुक्काम १ लोणी बुद्रुक, २ तळेगाव मळे,३ कोपरगाव बेट, ४ रांजनगाव, ५ समनापूर, ६ डोळासणे, ७ आळेफाटा, ८ नारायणगांव, ९ पेठ, १० चाकन, ११ चिखली, आणी आळंदीत पोहचल्यावर दि. ५ ते दि.११ पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होणार आहेत यामधे पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दूपारी ४ ते ५ प्रवचन, सायं.६ ते ७ हरीपाठ व रात्री ८ ते १० हरिकीर्तन असे नियोजन करण्यात आले आहेत…