
शिक्षणअधिकारी रा. जि. प. अलिबाग…
दैनीक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा शिक्षणासाठी सर्वस्वपणाला वाहून घेतलेल्या रायगड भूषण समाज सेवक मा.श्री कृष्णा महाडिक साहेब यांच्या प्रयत्नातून रायगड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची शैक्षिणक दर्जा उंचावयाचा असेल तर भौतिक सुविधा अत्यंत महत्वाचा भाग असून त्या साठी मा. श्री महाडिक साहेबानी लक्ष घालून आणि त्यांच्या प्रयत्नातून रायगड मध्ये अनेक शाळाचा कायापालट झालेला दिसून येत आहे.स्व.धनिबेन धरमशी वेला परिवार कच्छ गुजरात यांच्या समरणार्थ चंदुलाल सुखलाल मेहता चॅरिटेबल मुंबई यांच्या आर्थिक सहकार्यातून व महाराष्ट्र राज्याचे पहिले अर्थ मंत्री मा श्री सी.डी. देशमुख हे याच शाळेचे विद्यार्थी होते बांधण्यात आलेल्या रायगड ज़िल्हा परिषद शाळा तळे मराठी ( कन्या शाळा ) ता. तळा. येथील शाळा इमारतीचे नूतनीकरण उदघाटन सोहळा मा. श्रीमती पुनिता गुरव ( शिक्षणअधिकारी.रा. जि. प. अलिबाग ) यांच्या हस्ते दिनांक 25 नोहें 2023 रोजी पार पडले. विशेष सहकार्य चंदुलाल सुखलाल मेहता चॅरिटी मुंबई प्रमुख अथिति श्री नारायणभाई रावरीया गुजरात, श्री कमलेशभाई मेहता उद्योगपती सुरेंद्रनगर गुजरात, श्री विजय नागरथ पंजाब तर प्रमुख उपस्थिती जिजामाता शाळेचे मुख्याद्यापक संदिप कांबळेकर, श्री कदम सर, श्री लाड सर, सौ माधुरी घोलप, स्वाती पाटील, श्री कुलदीप बोघे, श्रीमती तांबट, सौ शिगवण, श्री गोळे मुख्याध्यापक जामकर मॅडम, उपशिक्षक सुनील बैकर सर, मितल वावगेकर, घाडगे पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.