
प्रतिनिधि/राखी मोरे
दैनिक चालु वार्ता/पुणे
दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.
प्रत्येक दुकानाची पाटी ही देवनागरी लिपीत तसेच ठळक अक्षरात असणे तेवढेच बंधनकारक आहे.मराठी सोबत असलेले इतर भाषेतील नाव इतर भाषेत असेल तरी चालेल, परंतु मराठीतील नाव हे ठळक आणि मोठ्या अक्षरात असावे.फेडरेशन ऑफ रीटेल ट्रेडर्स असोसिएशन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरात लावण्यास दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती.तरीही शहरातील अनेक दुकाने, हॉटेल, मॉल, शोरुम अशा अनेक आस्थापनांचे नामफलक मराठी लहान अक्षरात व इंग्रजी मोठ्या अक्षरात आहेत .महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये मार्च २०२२ ला सुधारणा केली त्यामधे कलम २६ क च्या तरतुदीनुसार दुकानांच्या पाट्या ह्या मराठी देवनागरी लिपीत तसेच त्या ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे.तरीही या नियमाचे उल्लंघन केल्या जात असल्यामुळे
आकाश चिन्ह विभागाचे उपायुक्त जगताप यांनी मराठी भाषेपेक्षा इतर भाषेतील मोठा नामफलक लावणाऱ्या व मराठी भाषेत पाट्या न लावणाऱ्या आस्थापंनावर कारवाई करण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त तसेच,उपायुक्तांना दिले आहेत व तसे परपत्रकही काढून दिले आहेत.
या मधे दुकानदारांनी अजुन एक विशेष नोंद घ्यायची आहे ज्या ठिकाणी मद्य विक्री किंवा मद्य पुरवठा केला जातो अशा कोणत्याही दुकानावर गडकिल्ल्यांचे किंवा महान व्यक्तींचे नावं असु नयेत. असेही या आदेशात महापालिकेने नमुद केले आहे.