
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- नाफेडच्या वतीने पीएसएफ योजनेअंतर्गत हंगाम २०२३ – २४ मध्ये बाजारभावाने तूर खरेदी करण्यासाठी पणन महासंघाच्या संस्थाकडून शेतकऱ्याची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. अर्धापूर ,हदगाव, कासराळी, देगलूर येथील केंद्रांना असे निर्देश देण्यात आले आहेत .नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड ,अचूक बँक खाते आणि ऑनलाइन पिकपेरा असलेला सातबारा आवश्यक आहे तरी या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.