
तलाठी अहवलानुसार तहसीलदार यांची दंडात्मक कारवाई;तर काम बंद करण्याचे आदेश…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : लखाड येथील नागरिकांच्या जीवास धोका उद्भवू नये यासाठी विलास हिरे व इतर नागरिकांनी त्यांच्या घरानजिक इंडस टॉवर उभारणी थांबविण्यासाठी तसेच शेत गट क्रमांक ३२८ मध्ये संबंधित माजी सरपंच यांचे सुपुत्र हे आपली आर्थिक बाजू प्रबळ करण्यासाठी नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहेत त्याकरिता लखाड येथील नागरिकांनी तहसील कार्यालयाला वारंवार पत्र व्यवहार करत पाठपुरावा केला.
त्या प्रकरणी तहसीलदार यांनी दि.१९ डिसेंबर २०२३ च्या आदेश पत्रानुसार सांगण्यात आले की,अंजनगाव सुर्जी मौजा लखाड येथील सुजय सत्यविजय निपाणे यांचे शेत गट क्रमांक ३२८ मध्ये सन २०२३ मध्ये इंडस टॉवर उभारण्याबाबत तलाठी अहवलानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे व मौजा लखाड येथील नागरिकांनी दि.२० रोजीचे उपोषणाची भूमिका मागे घ्यावे.तसेच सुजय सत्यविजय निपाणे शेत गट क्रमांक ३२८ शेतामधील अवैध टॉवर बांधकामावर कारवाई करत तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी टॉवर बांधकाम थांबविण्याचे सुद्धा यावेळी आदेश दिले आहेत.