
व्यवसायिकांना उपलब्ध करून देणार पर्यायी जागा
मुख्याधिकारी यांची ग्वाही…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव सुर्जी शहरातील महात्मा फुले चौकतील सौंदर्यीकरणासाठी २५ व्यावसायिकांवर नगरपरिषद प्रशासनाने दि.१५ रोजी कारवाईच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या.तर व्यवसायिकांच्या कुटुंबांना उध्वस्त होऊ न देता त्यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा व्यवस्था करण्यात येईल जेणेकरून त्यांना आर्थिक अडचण निर्माण होणार नाही अशी तोंडी ग्वाही मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी आज दि.२० रोजी व्यवसायिकांना दिली.
प्रशासक काळात नगरपरिषदेने महात्मा फुले चौकातील सलून, पान टपरी,किराणा दुकान,हॉटेल इत्यादी अनधिकृत शेड, बांधकामे यावरील कारवाईची वेग वाढवला.पण ज्या वेगात महात्मा फुले चौकातील कारवाई केली,त्याच वेगात अतिक्रमण धारक व्यवसायिकांना व्यावसायिक दृष्टिकोनातून जागा उपलब्ध करण्यात यावी अन्यथा व्यावसायिक देशोधडीला लागतील अशा प्रकारचं निवेदन अतिक्रमण धारकांनी यावेळी मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांना दिले.
निवेदन देतेवेळी शुभम गौर,बंडू नाथे,संतोष गौर,चंदू निसंग,अनिल लुटे,अशोक उंबरकर,नितीन निंबोकार,आनंद गौर,गजानन मंडवे,सुनील लुटे,शेख रशीद,पुन्नूलाल गौर,सचिन निंबोकार आदी व्यावसायिक उपस्थित होते.