
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष आरडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिक्षक संभाजी शिंदे व माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर चव्हाण,व्यवस्थापन समिती सदस्या राजश्री कानगुडे, सोनाली आरडे, रेश्मा गिरीश शिंदे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनमध्ये व्यवहारीक ज्ञान व गणितीय संकल्पना दृढ व्हावी या उद्देशाने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भाजीपाला, खेळणी, प्लास्टिक भांडी, भेळ फरसाण, वडापाव-भजी, चॉकलेट, शालेय वस्तूसह दररोजच्या वापरातील वस्तू आठवडे बाजार शाळेच्या प्रांगणात भरून विक्री केली. या मेळाव्यात पालकांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला आपल्या पाल्याला व्याव्हारीक माहिती व्हावी यासाठी पालक व ग्रामस्थांनी भाजीपाला व खाद्य पदार्थ खरेदी करून आस्वाद घेतला, या बाजारात विद्यार्थ्यांनी तब्बल २ हजार ४३० रुपयांची उलाढाल करत व्यावहारिक ज्ञान घेऊन मेळाव्याचा आनंद घेतला. यावेळी सर्व महिला,पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका चंदनशिवे मॅडम व सहशिक्षिका तोरसकर मॅडम यांनी मेहनत घेतली.