
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा : – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून सिंचन विहीर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. योजेनचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यासाठी मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा असतो. तर लोहा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कारेगावमध्ये सुधाकर पाटील किरवले यांनी शेतकऱ्यांच्या तब्बल ६८ सिंचन विहिरी कागदपत्रांचे झेरॉक्स पेपरचे पैसे न घेता शेतकऱ्यांना मंजूर करून दिल्या तर आतापर्यंत तब्बल १९ विहिरीचे काम पुर्ण झाल्याची माहिती सुधाकर पाटील किरवले यांनी दिली शेतकऱ्यांची कसलीच पिळवणूक न करता निस्वार्थी मनाने शेतकऱ्यांना तब्बल ६८ विहिरी मंजूर करून दिल्याबद्दल तालुकाभरात सुधाकर पाटील किरवले यांच्या नावाची चर्चा ऐकावयास मिळत आहे. व त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या जात आहेत.
दुसरीकडं लोहा तालुक्याचं चित्र पहावयास गेलं तर अनेक ग्रामपंचायती सिंचन विहिरी मंजूर करण्यासाठी २०००० ते ४०००० हजार घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्यची चर्चा ऐकावयास मिळत आहे. एवढेच नव्हे तर शासनाच्या ग्रामपंचायत मार्फत अनेक योजना चालु आहेत सदरील योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी गेला तर त्याची आर्थिक पिळवणूक होत असल्याची चर्चा लोहा तालुक्यात ऐकावयास मिळत आहे.