
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड:-कै.सौ.कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ येथील यशवंत महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून आयोजित कुसुम महोत्सवाचा शानदार समारोप सोहळा सायंकाळी अतिशय उत्साहात पार पडला.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब,माजी मंत्री भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब,माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण,माजी आमदार अमरनाथ राजूरकर साहेब* पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेब,मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल मॅडम,सौ.मृणाल ताई राजूरकर,उपस्थित होते यात भावी खासदार डॉ.मीनल पाटील खतगावकर यांनीही सहभाग नोंदवत हजेरी लावली.कुसुम महोत्सवाच्या माध्यमातून मुंबई येथील प्रसाद महाडकर आणि त्यांच्या टिमने मागील तीन दिवसांपासून सादर केली. एकापेक्षा एक सरस अशा कलाविष्कारांना भरभरून प्रतिसाद नांदेडकरांनी दिला यावेळी कार्यक्रमास नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.मंगाराणी ताई आंबूलगेकर,माजी महापौर मंगला ताई निमकर,माजी महापौर शैलजा ताई स्वामी,माजी स्थायी समिती सभापती किशोर स्वामी साहेब,दैनिक सत्यप्रभाचे संपादक संतोषजी पांडागळे साहेब,विजय येवनकर,कामाजी पवार मोठ्या संख्येने नांदेडकर उपस्थित होते.
सदरील महोत्सवाचे आयोजन श्री जयाताई चव्हाण,सुजयाताई चव्हाण यांनी केले होते.