
दै.चालु वार्ता वृत्तसेवा
लोहा:-पोखरभोसी ता लोहा येथील दै चालु वार्ता उस्माननगरचे पत्रकार लक्ष्मण कांबळे सर यांच्या आई कालवश शेवंताबाई रोहीदास कांबळे पोखरभोसीकर यांचे दि.२६/०५/२०२४ रोज रविवारी रात्री ११.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले आहे.त्या कलंबर सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी रोहीदास कांबळे यांच्या पत्नी असून तंत्रस्नेही शिक्षक अनिल कांबळे, दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी पत्रकार लक्ष्मण कांबळे, इंजिनिअर भिमराव कांबळे तसेच रमा राजू व्यवहारे यांच्या मातोश्री आहेत.त्यांचा अंत्यविधी मौजे पोखरभोसी ता.लोहा जि.नांदेड येथे दि.२७/०५/२०२४ रोज सोमवारी सकाळी ठीक ११.०० वाजता होणार आहे.कालवश शेवंताबाई यांचा मोठा परीवार असून पती,तीन मुले, तिनं सूना,एक मुलगी,जावाई,नातू,नाती आहेत.त्याच्या आत्म्यास शांती लाभो त्यांना दैनिक चालु वार्ता परीवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.