
केंद्रसरकारची घोषणा.
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे देशाचे पुढचे लष्कर प्रमुख होणार आहेत.अशी घोषणा सरकारने मंगळवारी रात्री केली ते विद्यमान लष्कर प्रमुख मनोज पांडे यांचा पदभार घेणार आहेत,ते ३० जून रोजी दुपारी पदभार घेतील.
पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर काम करण्याचा मोठा अनुभव द्विवेदी यांच्याकडे आहे. काश्मीर येथे त्यांची पोस्टिंग होती. सध्या ते उपलष्कर प्रमुख म्हणून काम करत आहेत. जनरल मनोज पांडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागेवर उपेंद्र द्विवेदी हे नवीन सेनाप्रमुख म्हणून कामकाज बघतील. सरकारने सेवाज्येष्ठतेचा नियम पाळत द्विवेदी यांना लष्करप्रमुख पदाची संधी दिली आहे.
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना चीन आणि पाकिस्तानलगतच्या सीमांवर काम करण्याचा चांगला अनुभव आहे.
सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून काम करत आहेत.