
पाकिस्तानच्या संघाने आधीच्या दोन सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर अखेर मंगळवारी विजयाचे खाते उघडले. टी२० विश्वचषक स्पर्धेतील पहिला विजय पाकिस्तानने कॅनडाविरूद्ध मिळवला. याआधी अमेरिका आणि भारत या दोन संघांनी पाकिस्तानला पराभूत केले होते. कॅनडाविरूद्धच्या सामन्यातही मात्र पाकिस्तानने ७ गडी राखून विजय साजरा केला. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने एक अतिशय विचित्र आणि अनोखा विक्रम आपल्या नावे केला.
तो म्हणजे टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात संथ अर्धशतक झळकावण्याचा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने आपल्या नावावर नोंदवला . त्याने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी तब्बल ५२ चेंडूत घेतले.
काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर याने निदरलैंड विरुद्ध खेळताना अर्धशतकासाठी 50 चेंडू घेतले होते..