
रविवारी, 9 जून रोजी जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला.
या दहशतवादी हल्ल्यातील नऊ मृतांमध्ये राजस्थानमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे.
रियासी पोलिसांनी यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे. तसेच कोणतीही आवश्यक माहिती दिल्यास 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नुकतेच पौनी भागात यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 9 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पोलीस हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.
वृत्तसंस्था ANI वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी वर्णन केलेल्या देखाव्यानुसार हे स्केच तयार करण्यात आले आहे. तसेच रियासी पोलिसांनी जनतेला कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास सांगण्याचे आवाहन केले आहे.