
नवी दिल्ली:वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये भारत दोन स्थानांनी घसरून 129 व्या स्थानावर आला आहे. त्याचबरोबर आइसलँडने क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. दक्षिण आशियामध्ये बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि भूताननंतर भारत पाचव्या तर पाकिस्तान शेवटच्या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर, सुदान 146 देशांपैकी निर्देशांकात शेवटच्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान तीन स्थानांनी घसरून 145 व्या स्थानावर आहे.
बांगलादेश, सुदान, इराण, पाकिस्तान आणि मोरोक्को यांच्याबरोबर आर्थिक समानता सर्वात कमी असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश आहे. या सर्वांनी अंदाजे उत्पन्नामध्ये 30 टक्क्यांपेक्षा कमी लैंगिक समानता नोंदवली आहे. पुरुषांच्या 100 रुपयांमागे भारतीय महिला 40 रुपये कमावतात.