
जालना प्रतिनिधी आकाश माने
जालना : आज दिनांक १८ जून रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान रामनगर मानेगाव सेवली संघर्ष समितीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आर्धनग्न आंदोलन केलय, जालना तालुक्यातील रामनगर ते मानेगाव सेवली रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे मागणीसाठी संतप्त नागरिकांनी आज आर्थ नग्न आंदोलन करत या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. रामनगर मानेगांव पाथुड सेवली या रस्त्याची दुरावस्था झालीय. रस्त्या अभावी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खराब रस्ता नसल्याने याठिकाणी अपघात होऊन काहींना जिव गमावा लागलाय, या अगोदर या रस्त्यासाठी रामनगर मानेगाव सेवली संघर्ष समितीने प्रशासनाला बरेच निवेदन दिले, आंदोलन केले मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं. त्यामुळे आज या संतप्त नागरिकांनी आक्रमक होत थेट जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आर्थ नग्न आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधलय. आजपर्यंत सदरील रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने ४५ लाख रुपयांचा आपत्कालीन निधी मंजूर केलेला होता व तो कागदोपत्री दाखवण्यात आलेला आहे. परंतु प्रत्यक्षात त्या रस्त्याचे काहीही काम झाल नसल्याचं आंदोलनकर्ते गणेश मोहिते म्हणालेत. आता तरी या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी रामनगर मानेगाव सेवली संघर्ष समितीने केलीय. यावेळी गणेश मोहिते संतोष ढेगळे मुकेश चव्हाण बद्री बटाडे गणेश डूगरे महादेव गिबट धनंजय पोहेकर सिध्दी आमटे गजानन शेजुळ संतोष राठोड विक्रांत चव्हाण यासह संघर्ष समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते