
दै, चालू वार्ता चाकूर प्रतिनिधी किशन वडारे
================================
चाकूर तालुक्यातील रोहिणा येथील ओबीसी समाजाचे लोक एकत्र येऊन ओबीसी आरक्षण जिवंत ठेवले जावे,तसेच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर समाजाला आरक्षण देण्यात यावे.तसेच प्रा.लक्ष्मण हाके यांनी वडी गोद्री ता.आंबड येथे ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी मागील सहा दिवसापासून उपोषणास बसले आहेत.ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी त्यांची मागणी आहे.तसेच मराठा समाजाला कशा प्रकारे आरक्षण देणार आहे याचाही सरकारने खुलासा करावा.ओबीसी समाजात एकूण ३५० जाती असून त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची दखल राज्य सरकाने घ्यावी.
कुणबी प्रमाणपत्र वाटप करताना टेबल ते टेबल प्रमाणपत्र वाटप केले जात आहेत.ते प्रमाणपत्र कोणत्या पुराव्या आधारे देण्यात येत आहेत.ते घटनाबाह्य असून त्याची सखोल चौकशी करावी अशी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची मागणी आहे.प्रा.लक्ष्मण हाके यांनी वडी गोद्री येथे ओबीसी समाजासाठी जे आमरण उपोषणास बसले आहेत त्या उपोषणाला रोहीणा (ता.चाकूर) येथील सर्व ओबीसी समाज बांधवांचा पाठींबा आसून आम्ही सर्वजण दि.१९ जुन २०२४ पासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर रोहीणा येथे सर्व ग्रामस्थ व ओबीसी समाजाच्या वतीने साखळी उपोषणास बसणार असल्याचे निवेदन चाकूरचे तहसिलदार नरसिंह जाधव यांना दिले आहे.या निवेदनावर माधव भिंगोले,सुरेश मुंढे,मच्छिंद्र नागरगोजे,अशोक केंद्रे, शामराव केंद्रे,राम भंगे,गणेश म्हेत्रे,शिवाजी डिगोळे,पंडित केंद्रे,रमेश मुंढे,वैजनाथ जिवनगे,नंदकुमार केंद्रे,मधुकर डोंगरे,बाळासाहेब केंद्रे,बालाजी केंद्रे,राहुल मुंढे,विठ्ठल केंद्रे,तुकाराम भिंगोले,रविकु�