
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
अशोकराव उपाध्ये / कारंजा अमरावती .
प्रजापिता ब्रम्हा कुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय अमरावती कडून गजानन टाऊनशिप महात्मा गांधी हॉल पोटे कॉलेज अमरावती येथे
दि१६ जून ते २२ जूनपर्यन्त राजयोग शिबीराचे आयोजन करण्यात आले .
शिबीराचे उदघाटण ब्रम्हा कुमारीज अमरावती केंद्राच्या प्रमुख राजयोगी सिता दिदि यांने हस्ते १६जून रोजी करण्यात आले याप्रसंगी राजयोगी इंद्रा दिदि; पोटे कॉलेजचे मॅनेजमेंट स्वीय सहाय्यक राजू राजस; स्त्री रोग तज्ञ डॉ आशाताई ठाकरे ग्रा पं सदस्य अर्चनाताई निमकर; सुभाष धोटे यांची प्रमुख उपस्थीती होती . परमात्माची आठवण करीत दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली . स्वागत गीत व नृत्याने उपस्थितांचे स्वागत झाले . बीके रोहीणी दिदि यानी विद्यालयात चालणाऱ्या उपक्रमाची माहीती उपस्थितांना दिली. ब्रम्हा कुमारीज विश्व विघालय मागील ८८ वर्षापासून १५० देशात मानवी मुल्य पुनरस्थापीत करीत असून व्यसनमुक्त ; सुख शांती युक्त जीवन देण्याचा प्रयत्न करीत आहे . यावेळी डॉ आशा ताईनी स्वताची व परमेश्वराची ओळख राजयोगा द्वारा होत असून हर परीस्थीतीचा सामना करण्याची शक्ती राजयोग शिक्षणातून मिळत असल्याचे सांगीतले . राजयोगीनी सिता दिदिआपल्या प्रमुख मार्गदर्शनातून म्हणाल्या की दिवसाची सुरवात परमात्म्याच्या आठवणीने करावी आणि श्रेष्ठ विचार नेहमी ठेवावे . राज योग मेडीटेशनने सुख शांती प्राप्त होत निरोगी तणाव मुक्त जीवन मिळते करीता सात दिवशीय शिबीराचा फायदा उपस्थितांनी घ्यावा असे आवाहनही सिता दिदि यांनी केले . याप्रसंगी इंद्रा दिदि यांनीही मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे संचलन बीके उषा दिदि अकोटकर यांनी तर आभार प्रदर्शन बीके प्रमोद भाई यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यास कृष्णा नगर सेवा केंद्राचा ब्रम्हा परीवार यांनी अथक प्रयत्न केले .