
प्रतिनिधी:श्री. रमेश राठोड सावळी सदोबा
सावळी सदोबा:-आर्णी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या निळेगांव या गावात मागील अनेक दिवसापासून ऊन्हाळ्यात पाणी पातळी खालावली जात असल्याने या गावात पाणी टंचाई निर्माण होत होती,या गावातील महिलांना मागील अनेक वर्षापासून पायपीट करून पाणी भरावे लागत होते, उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती,दरवर्षी या गावाचा पाणीटंचाई ग्रस्त गाव म्हणून तालुक्यातील गावांमध्ये हे गाव अग्रस्थानी होतं,मात्र या गावातील नवनिर्वाचित सरपंच शिवाजी डाखोरे व कर्तव्यदक्ष सचिव इकबाल साखळे यांनी काही ही करून या गावाला पाणी उपलब्ध करून द्यायचा निर्णय घेतला, या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जंगलात असलेल्या सार्वजनिक विहीर ही मागील अनेक दिवसांपासून पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे बंद पडली होती,मात्र ग्रामपंचायत सरपंच व सचिवाच्या कर्तव्यदक्षपणामुळे,एका आठवड्या भरातच जिर्ण झालेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करून, त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यात आल्याने गावाला हक्काच्या सार्वजनिक विहिरीवरून मागील २० वर्षापासून बंद असलेल्या सार्वजनिक विहिरीवरील पाणीपुरवठा सुरू करण्यात आला,त्यामुळे सरपंचाच्या कार्यतत्परतेने गावातील नागरिकांची तहान भागल्याने गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे,ऐन दुष्काळात पाणी उपलब्ध झाल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट थांबली,वास्तविक यापूर्वी सरपंचांनी गावासाठी प्रवेशद्वार सारखे अनेक स्वनिधीतुन राबविले आहेत,तसेच गावच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील आहे,त्यामुळे गावात कोट्यावधीची विकास कामे झालेली आहेत.त्यामुळे माळेगाव व निळेगाव या गावातील सचिवाच्या विकास कामावर खुश झाले आहेत,