
पोलीस व अग्निशामक दलाचे कर्मचाऱ्यांनी दिली शर्तीची झुंज.
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर): दिनांक 19 जून 2024 रोजी देगलूर बिदर हायवेवर कारेगाव जवळ मारुती सुझुकी वॅग्नर कार जळून खाक झाली . अजित नागनाथराव तोरणे हे आपली मालकी कार मारुती सुझुकी वॅगनर ने नायगाव हून माळेगावकडे जात असताना देगलूर जवळील कारेगाव रोडवर वेळ सायंकाळी 7:30 च्या सुमारास अचानक पेट घेऊन जळून खाक झाली गाडी क्रमांक एम एच 46 एक्स 0 532 हे असून अजित नागनाथराव तोरणे हे
वेळेच अग्नी क्षामक दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली कुठली जीवित हानी झाली नाही. तत्पूर्वी देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक झुंजारे यांनी आपल्या पोलीस यंत्रणेसह वेळेवर पोहोचून रस्त्यावरील ट्राफिक दूर करत अग्निशामक दलाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवले आग विजवल्यानंतर सहकाऱ्यांच्या साह्याने वाहने सुरक्षित काढून देण्यात आले व वाहतूक सुरळीत करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक झुंजारे पो हेकॉ इंगोले, पो हेकॉ जगताप, राईटर मोरे ,ड्रायव्हर पोलीस जावेद ,पोलीस संभाजी पाटील आणी अग्निशामक दलाचे कर्मचारनी परिश्रम घेतला .