
अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड
कारंजा तालुक्यातील वापटी कुपटी येथील कृषी सखी सौ . किरण वानरवडे व सौ . रुपाली पाडर यांचा दि . १८ जून २० २४
रोजी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फत वाराणसी उत्तरप्रदेश येथे प्रंतप्रध़ान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीत कृषी मंत्री ना. शिवराज सिंह चौहान यांचे हस्ते सत्कार करण्यात आला . आयोजित कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे साहेब व प्रकल्प संचालक किरण कोलते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश वाराणसी येथे कार्यक्रमास वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कॄषीसखी सौ.किरण वानखडे व सौ.रुपाली पाडर यांनी महाराष्ट्रातून प्रतिनिधीत्व केले. उपस्थित सर्व कॄषीसखी यांना भारत सरकार कॄषीमंत्री ना .शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.तसेच नैसर्गिक शेती व ग्रामीण भागात जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारच्या उपजिविका निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत पुढील कार्यासाठी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व कॄषीमंत्री ना. शिवराज सिह चौहान यांनी शुभेच्छा दिल्यात . कॄषीसखी यांनीही वाराणसी येथे प्रसार माध्यमातून आपली मुलाखत दिली.कार्यक्रमाला उपस्थित प्रभारी समन्वयक नरेंद्र उभआलकर ;प्रगतीशील शेतकरी रितेश पाडर उपस्थीत होते. त्यांना जिल्हा व्यवस्थापक खुजे , तालुका व्यवस्थापक सौ.ठाकरे मॅडम, आणि प्रकल्प संचालक कोवे यांचे मार्गदर्शन लाभले.