
दै.चालु वार्ता,
उदगीर, प्रतिनिधी
*अविनाश देवकते*
*लातूर (उदगीर) :*
*अपाहिज व्यथा को वहन कर रहा हूॅं ,*
*तुम्हारी कहन थी, कहन कर रहा हूॅं |*
या काव्यपंक्तीच्या माध्यमातून असह्य दुःख वेदनांना जाहीर प्रकट करण्याचे धाडस कवी करत असून लोक लाजेला भिऊन अन्याय अत्याचार सहन करत वरवर हसू दाखवणाऱ्यांच्या तोंडून कधी सत्य बाहेर पडेल हे सांगण्यासाठी
*’ये रोशनी है हकीकत मे एक छल लोगों,*
*की जैसे जल मे झलकता हुआ महल लोगो |’*
म्हणत लोकांनी आता हे सर्व सहन न करता याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे यासाठी..
*हो गई है परिवर्तनसी पिघलनी चाहिए,*
*इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए |*
अशा एकापेक्षा अनेक गजलांच्या माध्यमातून प्रस्थापितांच्या विरुद्ध विद्रोह पेरीत गजलेच्या माध्यमातून जणू उज्वल भविष्य सूर्याचे स्वागतच करत आहे की काय अशी कादंबरी म्हणजे ‘साये मे धूप’ ही होय. असे मत अमरेशजी श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.
*सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक्सद नही, मेरी कोशिश है कि ये सुरत बदलनी चाहिए |*
या व अशा स्वरूपाचे अनेक गजलांच्या रूपाने विद्रोहासाठी शस्त्र देणारे प्रसिद्ध गजलकार दुष्यंत कुमार लिखित ‘साये मे धूप’ या साहित्यकृतीवर प्रसिद्ध साहित्यिक अमरेश श्रीवास्तव लखनौ, उत्तर प्रदेश यांनी चला कवितेच्या बनात अंतर्गत चालू असलेल्या 315 व्या वाचक संवाद मध्ये अत्यंत प्रभावी असा संवाद साधला. डॉ.बी.आर.पाटील, आरोग्य अधिकारी लातूर यांच्या अध्यक्षतेखाली बोलताना श्रीवास्तव पुढे म्हणाले की साहित्य म्हणजे आतल्या वेदनांना प्रकट करणे. समाजात दररोज घडणारे अन्याय अत्याच्यार व वाढणारा असंतोष याशिवाय भ्रष्ट राजकारण्यांना उघडे पाडण्यासाठी साहित्य हे एक खूपच प्रभावी माध्यम आहे. दुष्यंत कुमार यांनी
*’मेरे सीने मे नही तो तेरे सीने मे यह आग कही लगनी चाहिए |.*
असे म्हणत अनेकांना व्यवस्थेच्या विरुद्ध आपल्या गजलेच्या माध्यमातून पेटवत राहिले. उठाव न करणाऱ्याला उद्देशून ते म्हणतात,
*तुम्हारे पैरों के नीचे कोई जमीन नही,*
*कमाल यह है की तुम्हे यकीन नही|.*
राजकीय नेता म्हणजे एक गुडिया आहे आणि याच एक गुडिया की कई कटपुतलीयोंमें जान है.| अशा टोकाच्या भाषेत अनेक गजला लिहिणारे दुष्यंतकुमार म्हणतात जर एक नेता अनेकांना पेटवू शकतो तेंव्हा मी तर कवी आहे. कारण मुजमे रहते है करोडो लोग, तो मै चुप कैसे रहूॅ.|अशा अनेक गजलांसह उदाहरणे देत या साहित्यकृतीवर प्रभावी संवाद साधला.
यानंतर झालेल्या चर्चेत अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शेवटी उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी लहान बालकांनाही वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने चालू केलेला ‘मी वाचलेले पुस्तक’ या सदराखाली कुमारी अल्लापुरे व कुमारी शर्वरी सोमवंशी या दोन मुलींनी त्यांनी वाचलेल्या पुस्तकातील काही कथा सांगितल्या. शेवटी अध्यक्षीय समारोपात डॉ.बी.आर.पाटील म्हणाले, की अनेक भाषांना एकत्र आणण्याचा गझल हा सर्वश्रेष्ठ साहित्यप्रकार आहे. मेरे गीत तुम्हारे पास सहारा पाणे आयेंगे, मेरे बाद तुम्हे मेरी याद दिल्याने आयेंगे. अशा कवींच्या या विचारांना सलाम करत प्रभावी अध्यक्षीय समारोप केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ.माधव कांबळे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय भागवत जाधव यांनी करून दिला शेवटी अध्यक्षीय समारोप डॉ.बी.आर. पाटील यांनी केला. शेवटी आभार मुरलीधर जाधव यांनी मानले
या कार्यक्रमासाठी खास लातूरहून आलेले शिक्षक नेते ब्रिजलाल कदम यांच्याच बरोबरीने प्राचार्य डॉ. शिवाजी सागर यांच्या सह अनेक लहान विद्यार्थ्यांबरोबरच महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक अनंत कदम,प्रा. राजपाल पाटील,आनंद बिरादार,तुळशीदास बिरादार हनुमंत मेत्रे आदींनी पुढाकार घेतला.