
१५ जुलै २०२४ पर्यत सुरू करू-बांधकाम विभाग राजापूर.
समिर शिरवडकर-रत्नागिरी
राजापूर :- ( दांडे-अनसुरे) – राजापूर तालुक्यातील सागरी महामार्गारील दांडे -अनसुरे-सागवे ला जोडणारा पूल गेली दोन वर्षे वाहतुकीसाठी पूर्ण बंद आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग ला जोडणार हा पूल वाहतुकीसाठी बंद असलेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी वाहन चालकांना अगदी राजापूर-डोंगर मार्गे जवळपास एक तास अंतर वळसा खालुन जावे लागत आहे.यामुळें परीसरातील ग्रामस्थ या वळश्याला पार विट्न गेले आहेत.
या पुलाच्या बांधकामाचा ठेका मे.घारपुरे या कंपनीकडे असुन,आज दोन वर्षे या पुलाचे काम करीत आहेत.आज दि.२० जून २०२४ ला राजापूर-लांजा-साखरपा चे आमदार सन्मा.राजन सळवी यांनी आपल्या सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ समवेत या पुलाला भेट दिली.वेळोवेळी ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला सदर कंपनी किव्हा कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत होते.सार्वजनिक बांधकामं उप विभाग राजापूर चे उप अभियंता दुधाडे साहेब,आणि प्रमोद कांबळे याना धारेवर धरत,मे.घारपुरे चे श्री.कामतेकर याना या बाबत जाब विचारला,सार्वजनिक बांधकामं अधिकारी यांना जाब विचारताच काही प्रमाणात अजूनही काम शिल्लक असून,उर्वरीत काम लवकरात लवकर करून येत्या १५ जुलै २०२४ पर्यंत वाहतुकीसाठी हा पूल सुरू होईल,तशी आम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा करू.समनधित ठेकेदाराला विचारणा केली असता,आमच्याकडे कामगार वर्ग उपलब्ध नसून,अजुन आमचे बिल देखील पास झाले नाही.अश्या व्यथा मांडल्या. परंतु, आमदार राजन जी साळवी यांनी “असल्या व्यथा आम्हाला सांगु नका, यांमुळे आपण आमच्या ग्रामस्थांना वेठीस धरू नका” ही जबाबदारी आपली असून आपले ठेकेदाररी मध्ये नाव चागल आहे,अश्या व्यथा सांगणे आपल्याला शोभत नाही” अश्या प्रकारे फटकारले. आणि १५ जुलै पर्यत जर पूल वाहतुकीसाठी खुला झाला नाही, तर शिवसेना स्टाईल ने संपुर्ण ग्रामस्थांना समवेत आंदोलन करू असा इशारा यावेळी समनधित विभाग,आणि ठेकेदाराला दिला.
यावेळी, सगवे विभागप्रमुख नंदकिशोर मीरगुले,शिवसहकार सेना उप जिल्हा संघटक समीर शिरवडकर,सागवे सरपंच सोनाली टुकरुल, ग्रापंचायत सद्स्य जुनेद मुल्ला , युवासेना तालूका समनव्यक प्रसाद माजरेकर , युवतीसेना तालुका युवतिधिकारी श्रुती गोलतकर, युवसेना विभाग युवाधिकारी प्रवीण गावकर, जैतापूर शाखाप्रमुख श्रीकृष्ण राऊत, कुवेशी शाखाप्रमुख विलास नाडणकर, मीठ गावणे शाखाप्रमुख संदीप चव्हाण ,गटप्रमुख सुनील करगुटकर, मंगेश बावकर -शाखाप्रमुख कुवेशी,
मंगेश गुरव माजी उपसरपंच
अनुष्का राणे ग्राम पंचायत सदस्य
संदेश बोटले ग्राम पंचायत सदस्य
सुनिल गावकर उर्फ धक्या गावकर, रोहन पुरळकर, इत्यादी शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.