
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
_नांदेड (देगलूर ); दिनांक 21 जून 2024 रोजी *परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला*.
याप्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष *मा.. डॉ.सुरेंद्र आलूरकर, प्रमुख उपस्थिती म्हणून देगलूरचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे(पी आय), तसेच योग मार्गदर्शनासाठी लाभलेले ब्र. विठ्ठल कोळनुरे* हे उपस्थित होते.
_________________________
कार्यक्रमाची सुरुवात *भारतमाता व अहिल्यादेवी होळकर* यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले विश्वनाथ झुंजारे सर यांनी मुलांना *नियमित योग करावे , एका दिवसाच्या योगाने फरक पडत नाही. योग आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे*. असे त्यांनी सांगितले.
यानंतर *योग गुरु कोळनुरे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे सूक्ष्म आसन तसेच कठीण आसन याचे विविध प्रात्यक्षिक सादर करून दाखवले*. प्रत्येक प्रात्यक्षिक सादर करत असताना त्याचे विशेष महत्त्वही सांगितले. *ध्यानधारणे पासून ते अनुलोम विलोम, ताडासन, वज्रासन, सूर्यनमस्कार, चक्रासन, भुजंगासन,* असे अनेक प्रकार करून विद्यार्थीना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून योगाचा अभ्यास केला.
यानंतर अध्यक्ष समारोपात डॉ.आलुरकर सरांनी मुलांना योग दिनाच्या शुभेच्छा देत *योग ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे*. असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश कुलकर्णी यांनी केले . सूत्रसंचालन सुजित मुकुटकर यांनी तर आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर यांनी मांडले .कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने सौ स्मिता कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे व दमण देगावकर यांनी प्रयत्न केले.
शेवटी सर्व मान्यवरांना व विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून ऊसळ वाटप करण्यात आले. या योग शिबिराला सर्व शिक्षक वर्ग व मान्यवरांचे सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.