
दै चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
बाजीराव गायकवाड
नांदेड:-नांदेड येथील राहूल सिताराम साळवे, अध्यक्ष बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती, विष्णुनगर, नांदेड यांनी निवेदनाव्दारे दिनांक २५ जून २०२४ रोजी आयोजीत नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्तांच्या दालणात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करत असल्याबाबत कळविले आहे.त्यामुळे निवेदनातील मुद्दे आपल्या विभागांशी संबंधित असल्यामुळे सदर निवेदन आपल्या विभागाकडे पाठविण्यात आले आहे.प्रस्तुत प्रकरणी निवेदनातील तक्रारीच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करुन, नियम / अद्यावत शासनादेश / न्यायप्रविष्ठ असल्यास कोर्टाचे आदेश इत्यादी विचारात घेवून नियमानुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच, दिव्यांग विभागाने उपरोक्त विभागाचा अहवाल एकत्रीत करुन संबंधित निवेदन धारकास दिनांक २५.०६.२०२४ रोजीचे नियोजित तीव्र स्वरूपाच्या आंदोलना पासून परावृत्त करावे सदर कामी दुर्लक्ष अथवा निष्काळजीपणा होणार नाही यांची दक्षता घ्यावी असे सहाय्यक आयुक्त नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड यांनी कळविले आहे.