
दै. चालु वार्ता प्रतिनिधि
समिर शिरवडकर-रत्नागिरी
राजापूरः – राजापूर शहरात किंबहूना राजापूर तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूच्या विक्रेत्यांनी घातलेला हैदोस यामुळे राजापूर शहरात किंबहुना तालुक्यात पोलिस स्थानक आहे की नाही असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.राजापूर शहर सोबत,नाटे अश्या अनेक तालुक्यातील भागात दाट वस्ती मध्ये हा गोवा बनावटीची चोरीचा धंदा राजरोसपणे अगदी खुशाल,सुरळीतपणे आपली परवानगी असल्याप्रमाणे सुरू आहे.याचे एकमेव कारण आपली उत्पादन शुल्क, पोलिस यंत्रणाचा यांना अभय.
गोवा बनावटीच्या हनी गाइड ( Made with grain spirit) च्या सतत आणि किमतीत स्वस्थ च्या सेवनामुळे २५-३० वयोगटातील तरुण आपल्या डोळ्यादेखत मृत्युमुखी पडताना दिसत आहेत,त्यांचे संसार वाऱ्यावावटळीत लागले आहेत,याला जबाबदार फक्त आणि फक्त उत्पादन शुल्क आणि समनधित पोलीस यंत्रणाच. अगदी दोन दिवसाअगोदर नाटे मधील तरुण याच हनी स्पिरिट च्या दारू मुळे मृत्युमुखी पडला असलेचे समजते. अजून काही तरुण याच वाटेवर असल्याची चर्चा नाटे परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे.
राजापूर शहरासह तालुक्यात गोवा बनावटीची दारू कोठून येते याबद्दल आश्चर्य म्हणजे अद्याप दारूबंदी खाते आणि पोलिस यंत्रणा यांना सुगावा लागलेला नाही. केवळ राजापूर शहरच नव्हे तर तालुक्याच्या विविध भागात दररोज गोवा बनावटीच्या दारूच्या विक्रेत्यांनी जणू राजसत्ता ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. राजरोसपणे शहरात हे विक्रेते राज्य आणि पोलिस शासनाला आव्हान देत घरोघरी दारू विकत आहेत. ग्रामीण भागात तर दहशतीने हे विक्रेते रेशन दुकानांप्रमाणे गोवा बनावटीच्या दारूची विक्री करीत आहेत. मध्यंतरी ज्यांनी शासनाचा वार्षिक कर भरून व्यवसाय सुरू केला होता त्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या मात्र अबकारी विभाग असो अथवा पोलिस प्रशासन यांनी या विभागाकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबल्याने गोवा बनावटीच्या दारू विक्रेत्यांनी आपले पूर्णतः बस्तान बसवले आहे. राज्य शासनालाच हे आव्हान असल्याने आणि वारंवार तक्रार होऊन देखील गोवा बनावटीच्या दारूचे विक्रेते हे प्रशासनच नव्हे तर जनतेला देखील भारी पडत असल्याने न्याय अपेक्षितच नसल्याची खंत नागरिकांची आहे.
मालाची एन्ट्री
गोवा बनावटीचा सदर माल हा तारळ मधून येऊन राजापूर शहारत किंबहुना तालुक्यातील अनेक भागात पोहचविला जातो असे समजते.
ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली
ग्रामपंचायतीला सर्व अधिकार असतात असं म्हणतात,परंतु काही ग्रामसभेत ठराव होवूनही त्यावर कारवाई होत नाही.
भर वस्तीत खुलेआम विक्री.
राजापूर शहराच्या एका भागात तर खुलेआमपणे गोवा बनावटीच्या दारूची राजरोसपणे विक्री केली जाते. आजुबाजुच्या महिलांना मद्यपी जेव्हा या स्वस्त दारूच्या खरेदीसाठी येतात तेव्हा तोंड लपवून वावर करावा लागतो. मात्र याबाबत ना पोलिस यंत्रणेला खेद आणि लगत वास्तव्याला असलेल्या पुरूष मंडळींना खंत अशी स्थिती ओढवली आहे.
…याआधी काही ठिकाणी पोलीसांनी छापे मारले आणि मुद्देमाल जप्त केला,पण त्या मुद्देमाल चे पुढे काय होते,हे लोकांना समजले पाहिजे, त्याचप्रमाणे सर्व विक्रेते( बार मालक) आपापल्या ठिकाणी विक्रीसाठी संध्याकाळी किव्हा दुपारी च्या वेळेस एका विशिष्ठ ठिकाणाहून हा गोवा बनावटीच्या माल आणून आपल्या बार मध्ये विकतात,या गोवा बनावटीची दारू मूळे त्रास सहन करावा लागतोच, पण मालक वर्ग नंतर दिवसेंदिवस गब्बर होताना दिसत आहेत.आता यावर पोलीस प्रशासन,तालुक्यातील सर्व पोलीस ठाणे काय कारवाई करतील या कडे लक्ष आहे.
गोवा बनावटीच्या दारूवर रोख लावून विक्रेत्यांवर कारवाई करणार पोलीस अधीक्षक रत्नागिरी- धनंजय कुलकर्णी
कारवाई झालीच पाहिजे, व आम्ही करतोच, परंतु आम्ही सतत त्या ठिकाणी राहू शकत नाही,त्यासाठी आम्हला दारू बंदी साठी तालुक्यातील सर्व ग्रामसभेंने सहकार्य करावे
राज्य उत्पादन शुल्क उप निरीक्षक लांजा :- प्रभात सावंत.