
दै. चालु वार्ता रोहा प्रतिनिधी अजय परदेशी
जिल्ह्यातील गड, किल्ले, समुद्र किनारे, धबधबे यासह विविध ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाय केले जाणे गरजेचे आहे तहसील व उपविभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी या साठी गाव पातळीवर यात्रनाच्या माध्यमातून कार्यवाही कारवाई असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत आढावा बैठक प्रसंगी ते बोलत होते बैठकीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे , जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी डॉ. भरत बस्टेवाड विविध शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ऑनलाईन बैठकीत सहभागी होते जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले मान्सून पर्यटन आणि पावसाळा या पार्श्वभूमीवर दुर्घटना होऊ नये यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तलाठी आदींच्या सहभागाने गाव पातळीवर समिती स्थापण करण्यात यावी या समितीद्वारे सादर गावाचा परिसर हदितील पर्यटन स्थळ तलाव, धबधबे, समुद्र किनारा अशा जागांवर जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात उपविभागीय अधिकारी सह तहसीलदार , गट विकासअधिकारी, पोलिस अधिकारी यांनी नागरिकांना विविध माध्यमातून सतर्क करावे असे सूचित केले यावेळी पोलिस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी महत्वाची सूचना केली मोरबे धरणाची सुरक्षा व्यवस्था, काशीद समुद्र किनारा येथे पर्यटक सुरक्षेसाठी वॉच टॉवर उभारणे विविध गड किल्ले अदी ठिकाणी संबधित विभागाच्या वतीने उपययोजना करणे बाबत चर्चा करण्यात आली या प्रसंगी उपस्थितीत उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता रुपाली पाटिल, कार्यकारी अभियंता महेश नामदे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अंबादास देवमाने , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष विखे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी बैठकीत सहभागी होत विविध माहिती दिली..