
दै चालु वार्ता प्रतिनिधीपुणे/पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
पंढरीची वारी आहे माझ्या घरी ।आणिक न करी तीर्थवृत्त ।वृत्त एकादशी करीन उपवासी।गाईन अहर्निशी मुखी नाम।नाम विठोबाचे मी वाचे।बीज कल्पांतीचे तुका म्हणे।
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३३९ व्या आषाढी पायी वारी सोहळ्याचे आज शनिवार ( ता.२९ ) रोजी सकाळी १० वाजता विठू नामाच्या गजरात , इनामदार साहेब वाड्यातील पहिला मुक्काम होऊन हा पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला.कुठलेही वृत्त नाही,अन्य तीर्थ नाही,जे नेहमी उपवाशी राहून एकादशी करणे हेच ज्यांच्या घरी वृत्त असत,ज्यांच्या मुखी विठोबाचे नाव असते.आणि सतत ज्यांच्या तोंडात विठोबाचेच नाव असते. असते अशा वारकऱ्यांना आस लागलेली असते ती पंढरीच्या पांडुरंगाला पाहण्याची आणि आज लाखो संख्या असलेला हा वैष्णवांचा मेळा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्या बरोबर आषाढी पायी वारी करण्यासाठी पंढरपूरकडे निघाला आहे. पाऊस पडो ,न पडो ,पेरण्या होवो न होवो न होवो कशाचीही चिंता न करता ,ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता हा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इनामदार साहेब वाड्यातून आज देहूतून पंढरीकडे मार्गस्थ झाला.
*इनामदार साहेब वाड्यात शासकीय पूजा*
पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,जिल्हाधिकारी सुहास दिवसे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील,तहसीलदार जयराज देशमुख,नायब तहसीलदार प्रवीण ढमाले,गटविकास अधिकारी भूषण जोशी,सहाय्यक पोलीस आयुक्त मुगुटराव पाटील यांच्या हस्ते पादुकापूजन झाले.यावेळी
संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे,पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे,संतोष महाराज मोरे,माणिक महाराज मोरे,विश्वस्त संजय महाराज मोरे,भानुदास महाराज मोरे,अजित महाराज मोरे,वंशज दिलीप गोसावी, मंडलाधिकारी दिनेश नरवडे,संजय सईद, तलाठी अतुल गीते अतुल माने सूर्यकांत काळे,देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे,नगराध्यक्ष पूजा दिवटे,कार्यालयीन अधीक्षक रामराव खरात,अभियंता संघपाल गायकवाड, अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
*नगर पंचायती तर्फे दिंड्या प्रमुखांचे स्वागत*
संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची सकाळी १० वाजता इनामदार साहेब वाड्यातून प्रस्थान केल्या नंतर हा पालखी सोहळा बाजरपेठ मार्गे शिवाजी चौकातून जुन्या ग्राम पंचायत कार्यालया समोर आला असता, देहूनगर पंचायतीच्या वतीने प्रत्येक दिंडीतील विणेकऱ्यास उपरणे श्रीफळ तसेच एक वृक्षांचे रोपटे ,मार्गदर्शक पुस्तिका आणि एक प्राथमिक औशोधोपचाराचे किट देऊन स्वागत केले.देहूनगर पंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, तसच इतर अधिकारी माजी सरपंच रत्नमाला करंडे , हभप जालिंदर महाराज काळोखे यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.
पालखी सोहळा मुख्यप्रवेशद्वारात आला असता त्या ठिकाणी पालखीवर फुलांचा वर्षाव करून भव्य स्वागत करण्यात आले.
*अंगदशहा बाबा दर्गा येथे अभंग व आरती*
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे शिष्य अनगड शहा यांच्या दर्ग्यावर पालखी दुपारी १२ वाजता आली.त्या ठिकणी अनगडशहा बाब ट्रस्टचे नजीर मुलाणी ,फारुख मुलाणी ,बक्षीर मुलाणी यांच्या वतीने तुकाराम महाराजांना मान देण्यात आला.त्या ठिकाणी देहू देवस्थानच्या वतीने *वैष्णवा संगती सुख वाटे* हा अभंग घेण्यात आला.आणि परंपरे प्रमाणे पोपट बिरदवडे ,साधू परंडवाल ,प्रितम वारघडे ,तसेच या ठिकाणी कै. आनंदराव काशीद भंडारा डोंगर यांच्या स्मरणार्थ मेघडंबरी बांधणारे बाळासाहेब काशीद यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या ठिकाणी अतिरिक्त कार्यकारी आभियंत्या स्नेहलता हनचाटे ,सहायक अभियंता संतोष झोडगे, विनोद वाघमारे , तसेच देहूनगर पंचायतीचे नगरसेवक , आदी मान्यवर उपस्थित होते.अंनगडशहा बाबा दर्गा येथील पहिली अभंग घेऊन जगद्गुरू संत तुकाराम हाराज पालखी सोहळा दुपारी १२ :३० वाजता निघून दुपारी २ : ३० वाजता चिंचोली येथील संत तुकाराम महाराज पादुका विसावा मंदिर या ठिकाणी पोचला.त्या ठिकाणी शैनेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दत्राय माधव , रमेश जाधव,दत्राय लांडगे , तसचे ट्रष्टचे सर्व सभासद यांच्या वतीने आरती करण्यात आली.आरती नंतर पालखी सोहळा या ठिकाणी विसावला. लाखो वारकरी भाविक भक्तांच्या गर्दीमुळे या ठिकाणाला भक्तांचा महासागर उसळला असल्या सारखे स्वरूप निर्माण झाले होते..
चिंचोली येथील आरती व पहिला विसावा घेऊन पालखी सोहळा पुढे आकुंडीकडे मार्गस्थ झाला.
दरम्यान देहूरोड येथे पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत करण्यात आले.
.यांनी केली वारकरी भाविक भक्तांची सेवा
देहूगाब रोटरी क्लब व रोटरी क्लब ऑफ आकुर्डी यांच्या सयूंक्त विध्यमाने वारकरी भाविक भक्तांना घोंगते ,जगद्गुरू मित्र मंडळ काळोखे मळा , सीओडी डेपो ,संरक्षण विभाग यांच्या वतीने ,बिस्कीट ,पाणी ,सरबत ,पोह्यांचे वाटप करण्यात आले.चिंचोली येथे पुणे इंजिनिअरिंग तळेगाव यांच्या वतीने बंदी वाटप , तर देहू इस्कॉन संस्थेच्या वतीने भाविक भक्तांना महाप्रसादाचे ( अन्नदान ) वाटप करण्यात आले.अशा प्रकारे अनेक भाविक भक्तांनी विविध स्वरूपाची सेवा केली.