
दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी।
किशोर फड
बीड/अंबाजोगाई
खोलेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठीच्या ८ कोटी ३० लक्ष रुपये
अंबाजोगाई शहराच्या धार्मिक,पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरेशी जोडल्या गेलेल्या खोलेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग यांच्याकडून ८ कोटी ३० लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात यश आले.
आज खोलेश्वर मंदिर संवर्धन कामाचा शुभारंभ आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आला. या संवर्धन कामामुळे मंदिराला त्याचे गतवैभव प्राप्त होणार आहे.
या प्रसंगी खोलेश्वर मंदिराचे विश्वस्त ॲड.श्री.शरद अण्णा लोमटे, श्री.अरुण काळे, श्री.रवींद्र जाधव, श्री.अविनाश धायगुडे, आर्किटेक्ट श्री.आकाश कराड, श्री.कल्याण काळे, श्री.धनराज सोळंकी, डॉ.श्री.निशिकांत पाचेगावकर, श्री.प्रशांत आदनाक, श्री.सुनील अडसूळ, श्री.प्रकाश बोरगावकर, ॲड श्री.शेरेकर, श्री.अतुल जाधव, श्री शिरिष मुकडे, श्री.सुनील मस्के, श्री.अमोल विडेकर, श्री.अनंत अरसुडे, श्री.तुकाराम सातपुते, श्री.अभिनव उपाध्ये, श्री.नरसिंग नंदगवळी, श्री.बिभीषण भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.