
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी :- संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर);युनिव्हर्सल कराटे अकॅडमी व जीके इंटरनॅशनल कराटे अकॅडमी यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या निमंत्रित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल चा संघ सर्व दुतीय क्रमांक पटकावून कराटे स्पर्धेत सलग विजयाची परंपरा ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राखली या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 600 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यात ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलच्या 29 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गटांमध्ये सहभाग नोंदवत चमकदार कामगिरी करत प्रति स्पर्धकाला हरवत यशाला गवसणी घालून वेगवेगळ्या पदकाची कमाई करत सांघिक सर्व द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय रमेश बिरादार त्याचबरोबर मॅनेजिंग डायरेक्टर सुयेश बिरादार सुजित बिरादार प्राचार्य आम्रपाली सरवदे प्रशासकीय अधिकारी रामेश्वर सगरे आदींनी सर्व विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या त्यांना कराटे प्रशिक्षक प्रसाद माळी सर क्रीडा शिक्षक विठ्ठल गुरमे विशाल कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते