
दैनिक चालू वार्ता
अहमदपूर तालुका प्रतिनिधी,श्री हाणमंत जी सोमवारे
लातर जिल्हा/अहमदपूर : मुख्य शहरात शिवाजी चौक बस स्टॅन्ड शेजारी उपमुख्यमंत्री यांचा अहमदपूर ताफा येत असताना सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आडवीला ताफा दरम्यान वेळी समय सूचक म्हणून एक संवेदनशील विषयावर थोडक्यात मनोगत व्यक्त करून निवेदन घेऊन त्यांचे मत जाणून घेऊन अनुमोदन देत पुढील. सभेसाठी मार्गक्रम करताना दिसले,
सविस्तर माहिती अशी कि. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलकांनी आज मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणावर तुमची भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी करत आंदोलक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे मंत्री, नेते आज लातूर जिल्ह्यातील चाकूर, अहमदपूरमध्ये होते. चाकूर येथे कार्यक्रमस्थळी जात असताना मराठा आंदोलकांनी अजित पवार यांच्या गाडीसमोर येत त्यांना रोखले. मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून कायम आहे. सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रसे म्हणून तुमची भूमिका काय? हे स्पष्ट करा, अशी मागणी करत आंदोलकांनी अजित पवारांना निवदेन दिले.
यावेळी मराठा आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. अजित पवार यांनी आंदोलकांशी संवाद साधला, त्यांचे निवेदन स्वीकारले आणि सरकार या मागण्यांवर निश्चित विचार करेल, असे सांगत ते कार्यक्रमाला निघून गेले. दरम्यान, अहमदपूर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी अजित पवार यांचे भाषण सुरू असतांना मुख्य प्रवेशद्वारावर मराठा आंदोलकांनी आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली होती.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ यासह महिलांसाठी राज्यात राबवण्यात येत असलेल्या विविध योजना आणि विकास कामे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात ‘जन सन्मान यात्रा’ सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या निमित्ताने अहमदपूर, चाकूरमध्ये आले होते. या दोन्ही ठिकाणी त्यांना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या समाज बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
ओबीसीमधून आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पवार यांच्यासमोर घोषणाबाजी केली. यावेळी अजित पवारांनी या आंदोलकांशी चर्चा केली, त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारत योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. अहमदपूर येथेही जन सन्मान यात्रेनिमित्त जिजाऊ फन्क्शन हॉलमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
त्यांचे भाषण सुरू असताना सकल मराठा समाज बांधवांनी हॉलच्या गेटसमोर मराठा आरक्षण संदर्भात घोषणा दिल्या. पोलिसांनी कार्यकर्त्यांना त्याच ठिकाणी रोखून धरले. एकूणच मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या समाज बांधवांकडून राजकीय नेते, मंत्री, सत्ताधारी, विरोधक अशा सगळ्यांनाच जाब विचारला जात आहे.