
अविनाश कदम
कंधार तालुका ग्रामीण प्रतिनिधी
हाडोळती तालुका अहमदपूर येथील दयानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मराठी विषयाचे शिक्षक श्री शशिकांत इरवंतराव कदम हे प्रदीर्घ सेवेनंतर दि.31 ऑगस्ट 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवा काळ 32 वर्ष 02 महिने 21 दिवस झाला आहे. ते एक उपक्रमशील शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते.कोरोना काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने ज्ञानदान देण्याचे त्यांचे कार्य चालू होते. सदरील कोरोना काळात महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. 2020 मध्ये त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. ते एक विद्यार्थी व पालक प्रिय व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या सेवा निवृत्तीच्या पुढील आयुष्यासाठी संस्थाध्यक्ष प्रा. पी.टी. पवार सर, सचिव डॉक्टर निलेश भैय्या पवार ,प्राचार्य कौडगावे जी.व्ही., माजी प्राचार्य व्यंकटराव मुळके, माझी प्राचार्य नरवडे पी.एस., माजी प्राचार्य जोगदंड आय. एम., शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.