
दैनिक चालु वार्ता,
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):-भरतशेठ शहा मित्र परिवार यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या २०२४ दहीहंडी उत्सवाचा मानकरी इंदापूर येथील तिरंगा गोविंदा पथक ठरला.
त्यांनी तब्बल ६ थर लावत ही हंडी फोडली. महात्मा फुले संघाने ७ थर लावून सलामी दिले होती. परंतु दुसऱ्या फेरीमध्ये महात्मा फुले संघाला दहीहंडी फोडण्यामध्ये अपयश आले. यावेळी खास उपस्थिती दर्शविलेल्या सिनेकलाकारांना पाहण्यासाठी तसेच दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी इंदापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत डिजेच्या तालावर प्रेक्षकांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.
यावेळी तब्बल सहा संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी विजेत्या संघाला भरतशेठ शहा यांच्या माध्यमातून ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तर महात्मा फुले गोविंदा पथक इंदापूर, संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी संघ, शिवशंभो दहीहंडी संघ, छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ दहीहंडी संघ, स्वराज्य दहीहंडी संघ, नेताजी दहीहंडी संघ या संघांनी महोत्सवात थरावर थर रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला.या संघांनाही रोख ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सिने अभिनेत्री मानसी नाईक सह इतर रशियन डान्सर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात अनोखी रंगत आणली. त्यांच्या व्यासपीठावरील आगमनानंतर युवाईने एकच जल्लोष केला.
यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख, अकलूज ग्रामपंचायत चे सरपंच शिवतेजसिंह मोहीते -पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव राहुल मखरे, विलास माने,तेजसिंह पाटील, रोहित मोहळकर, शिवाजी मखरे, अमोल भिसे, विकास खिलारे,संदिपान कडवळे,प्रशांत उंबरे, अक्षय सुर्यवंशी, जावेद मुलाणी, निवास शेळके,नंदकुमार गुजर, डॉ. संजय शहा, डॉ. श्रेणिक शहा, संजय दोशी, गणेश महाजन, ॲड .राकेश शुक्ल, रामकृष्ण मोरे, रवी सरडे, ॲड .आशुतोष भोसले, आनंद केकाण, पोपट पवार, अंकुश माने, विनायक बाब्रस, गजानन गवळी, संदीप पाटील, शकील सय्यद, फिरोज पठाण, बिल्डर मोहसीन शेख, प्रशांत उंबरे, निखिल महाजन, श्रीकांत माने, रश्मी शेख, उमेश ढावरे,भरत शहा मित्र परिवार, आदी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत भरतशेठ शहा, मुकुंदशेठ शहा,अंकिता शहा, वैशाली शहा, रुचिरा शहा,अंगद शहा व शहा परिवाराच्या वतीने करण्यात आले.