
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव/भूम:-धाराशिव जिह्यात आजी व माजी सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याच्या हेतूने एक जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.जिह्याचे पोलीस अधीक्षक हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असून त्यांच्या अधिपत्याखाली एकूण १२ सदस्यांची ही समिती जिल्ह्यात काम करणार आहे. त्यामधे प्रत्येक तालुक्यातुन एका माजी सैनिकाचा सहभाग करण्यात आला यामध्ये भूम शहरातील माजी सैनिक प्रभाकर हाके यांची निवड झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष विकासरत्न संजय गाढवे यांनी हाकेंचा सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी मा.सै. पौळ, वाघमोडे ,पोपट जाधव, रामकिसण बप्पा गव्हाणे.प्रा.साठे तसेच मा.सैनिक बांधव व विकासरत्न संजय नाना गाढवे मित्र परिवार उपस्थित होते.