
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव/भुम:- उपजिल्हा रुग्णालय रुग्णकल्याण समिती सदस्यपदी युवा नेते प्रभाकर शेंडगे यांची निवड पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या आदेशाने करण्यात आली. ही निवड झाल्याने प्रभाकर शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला.शिवसेनेचा युवा कार्यकर्ता म्हणून प्रभाकर शेंडगे परिचित आहेत.पक्ष देईल ती जबाबदारी काटेकोरपणे पार पाडणारे, जील्हाचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री सावंत यांच्या आरोग्य विभागाच्या योजना सर्व सामान्यांपर्यंत तसेच तळागाळापर्यंत पोहोचवत असे त्यांनी केलेल्या कष्टाचे फळ म्हणून त्यांनी हे पद मिळविले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून शेकडोच्यावर नागरिकांना त्यांनी मदत मिळवून दिली आहे. निवड झाल्याने प्रा डॉ. तानाजीराव सावंत युवा मंचच्या वतीने आनंद साजरा करण्यात आला.आरोग्यदुत डॉ.राहुल घुले यांच्या वतीने युवा नेते प्रभाकर शेंडगे यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हाउप प्रमुख दत्ता बापु मोहिते, तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ,श्री.महमने,सुभाष देवकते आदी मान्यवर उपस्थित होते.