दै. चालू वार्ता,
पैठण प्रतिनिधी, तुषार नाटकर-
पैठण : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दिलिप स्वामी, माजी सभापती विलास भुमरे हे पैठण येथील नाथ सागर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे, त्या संदर्भात पालकमंत्री यांचा पाहणी दौरा नाथसागर धरणाच्या गेटजवळ आला, तेव्हा मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडविला व एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यादरम्यान पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आंदोलकाशी चर्चा करत “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपतींच्या चरणापुढे नतमस्तक होत मराठा समाजाला आरक्षण देणार अशी शपथ घेतली आहे आणि ती पुर्ण करणारच” अशी ग्वाही दिली, परंतू मराठा आंदोलक यांनी मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसीतून ते पण पन्नास टक्याच्या आत ही मनोज जरांगे यांची जी मागणी आहे, त्या संदर्भात आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करा, तसेच पैठण तहसिल कार्यालय येथे कुणबी नोंदी मिळूनही प्रशासनाकडून प्रमाणपत्र मिळण्यास बऱ्याचशा अडचणी येत आहे, त्यावर तात्काळ उपाययोजना करा अशी विचारणा केली, त्यावर पक्षाची भूमिका हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगतील तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना तात्काळ आदेश करत पैठण तहसील कार्यालयाच्या कामाचा आढावा घेऊन कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास ज्या काही अडचणी येत आहेत त्या तात्काळ दूर करा असे सांगितले आहे. यावेळी मराठा आंदोलकाच्या घोषणांनी नाथसागर परिसर दुमदुमून गेला होता.
माजी सभापती विलास भुमरे यांनाही मराठा आंदोलकांनी विचारला जाब
पैठण येथे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सत्ताधारी पक्षाचे शिवसेना शिंदे गट पालकमंत्री अब्दुल सत्तार, माजी सभापती विलास भुमरे पैठण दौऱ्यावर आले असता, सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा ताफा अडवत तीव्र घोषणाबाजी केली, तसेच मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांचे चालू असलेल्या ओबीसीतुन मराठा समाजाला आरक्षण मिळावे या आंदोलनाविषयी पक्षाची भूमिका स्पष्ट करावी व मराठा समाजाला आरक्षण तात्काळ द्यावे, अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जाव लागणार जे तुम्हाला परवडणार नाही असे मराठा आंदोलकांनी ठणकावून सांगितले…!
