दै.चालु वार्ता,
लातूर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :उदगीर राखीव विधानसभा मतदारसंघाची जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची आहे अशी भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी लातूर जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची ताकद उदगीर विधानसभा मतदार संघामध्ये असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महायुतीमध्ये येण्या अगोदर 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माननीय नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात तिसरी आघाडी म्हणजेच रिडालोस ची स्थापना करण्यात आली होती व तसेच 2009 च्या निवडणुकीमध्ये रिडालोस कडून संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार थांबविण्यात आले होते तसेच उदगीर मतदार संघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गौतम भालेराव यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी अचानक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने गौतम भालेराव यांना उमेदवारी देऊन देखील कसलीही पूर्वतयारी नसताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार गौतम भालेराव यांनी तब्बल 18000 मतदान 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उदगीर मतदार संघात घेतले होते त्यामुळे त्यावेळी सत्ताधारी असलेल्या पक्षाचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांचा पराभव झाला होता 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये नामदार रामदास आठवले साहेब यांच्या पुढाकाराने राज्यामध्ये महायुती तयार करण्यात आली म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष महायुतीचा प्रमुख घटक पक्ष आहे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची ताकद उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये असल्यामुळे महायुतीतील उदगीर राखीव मतदार संघाची जागा ही रिपाईचीच असल्याची भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केली आहे.
