
पुणे / प्रतिनिधी
पुणे : दिनांक २४ व २५ ऑगस्ट २०२४ रोजी कर्नाटक येथे नेहरू युवा केंद्र भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ युथ अफेर्स अँड स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात महाराष्ट्र संघाने द्वितीय क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले महाराष्ट्र राज्यातून विविध जिल्ह्यातील 72 खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यात 132 पदके मिळवत स्पर्धेत आव्हान टिकवून ठेवत व्दितीय क्रमांक पटकावला महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून पुण्यातील कराटे प्रशिक्षक आंतरराष्ट्रिय खेळाडू श्री.कृष्णा हनुमंत आडागळे तर महाराष्ट्र संघ व्यवस्थापक म्हणून सांगलीचे कराटे प्रशिक्षक श्री. आप्पासाहेब तांबे यांनी कामगिरी पार पाडत संघास द्वितीय क्रमांक पटकावण्यात मोलाची भूमिका बजावली .